Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»भुसावळ परिसरात साकेगावजवळ निलगायचा अपघाती मृत्यू;

ताज्या बातम्या

भुसावळ परिसरात साकेगावजवळ निलगायचा अपघाती मृत्यू;

Editorial DeskBy Editorial DeskMarch 10, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

वेगवान वाहनांवर कारवाईची प्राणीमित्रांची मागणी

भुसावळ प्रतिनिधी : साकेगाव परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून पाण्याच्या शोधात आलेल्या एका बलाढ्य नर निलगायचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील प्राणीमित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत असून वेगवान वाहनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकेगावजवळील नदीकाठी पाण्याच्या शोधात आलेल्या नर निलगायला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत निलगाय दूर फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती शहरातील गोसेवक बल्लू धायडे आणि रोहित महाले यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वनविभागाला याबाबत कळविले.

या घटनेनंतर प्राणीमित्रांनी शासनाकडे गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.

गोसेवक रोहित महाले यांनी सांगितले की, सध्या प्रचंड उष्णतेमुळे वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने विविध ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून प्राण्यांना पाण्यासाठी रस्त्यावर किंवा मानवी वस्तीमध्ये यावे लागणार नाही.तसेच, वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अशा निष्पाप प्राण्यांचे जीव जात असल्याने प्रशासनाने वेगवान वाहनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. “प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. वन्य प्राण्यांनाही जगू द्या,” असे आवाहन रोहित महाले यांनी केले.दरम्यान, या घटनेमुळे साकेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून वनविभागाने या प्रकरणाची नोंद घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

सारोळा ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी होणार; आ. किशोर पाटलांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

September 16, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात ‘नमो उद्यान’चे लोकार्पण

September 16, 2026

३४ हजार न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; जळगावात काळ्या फिती लावून निषेध

September 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add