Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सभासद गुणवंत पाल्य गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सभासद गुणवंत पाल्य गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

Editorial DeskBy Editorial DeskMarch 10, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव जिल्हा जळगाव तर्फे सभासद गुणवंत पाल्य गुणगौरव सोहळा पार पडला.

जळगांव प्रतिनिधी : खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव जिल्हा जळगाव तर्फे सभासद गुणवंत पाल्य गुणगौरव सोहळा पार पडला. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खाजगी प्राथमिक महासंघचे राज्याध्यक्ष श्री राजेंद्र निकम, महासचिव श्री विठ्ठल उरमुडे, अहिल्यानगर सचिव श्री शेखर उंडे, सदस्य श्री अमोल शिंदे, नाशिक टिडीएफ संघटक श्री दिनेश देवरे, राज्य कार्यकारणी सदस्य श्री हेमंत कुमार पाटील,श्री देवेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष श्री अजित चौधरी, जिल्हा सचिव श्री जीवन महाजन जिल्हाकार्याध्यक्ष श्री राकेश पाटील उपस्थित होते.

संस्थेचे सभासद पाल्य यांनी नेत्र दीपक यश मिळवले त्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला. तसेच विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या सभासद पाल्यांचा विशेष सत्कार सुद्धा करण्यात आला. संस्थेतर्फे आयोजित गुणगौरव सोहळ्यात ज्यांचा गौरव होत आहे असे सर्व विद्यार्थी देशाचे उज्वल भवितव्य घडवतील असे प्रतिपादन खाजगी प्राथमिक महासंघाचे राज्य अध्यक्ष श्री राजेंद्र निकम सर यांनी केले. खाजगी प्राथमिक पतसंस्था व खाजगी प्राथमिक संघ यांचा उत्तम समन्वय जळगाव जिल्ह्यात असल्याने असे आयोजित होणारे नाविन्यपूर्ण विविध उपक्रम प्रेरणादायी आहे, असे मत महासचिव श्री विठ्ठल उरमुडे यांनी मनोगत व्यक्त केले.संस्थेचे कार्य सभासद हितार्थ आहे, संस्था राबवत असलेल्या विविध योजना प्रशंसनीय व प्रेरणादायी आहे,असे प्रमुख पाहुणे यांनी मनोगतातून व्यक्त केले.

गुणगौरव सोहळ्यास खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे माजी अध्यक्ष – उपाध्यक्ष, माजी संचालक , सर्व सभासद बंधू, गुणवंत पाल्य बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक श्री सुनील पवार सर तसेच आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक श्री गणेश लोडते सर यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री अमित चौधरी , पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री स्वप्निल पाटील,खाजगी शाळा कर्मचारी संस्थेचे माजी अध्यक्ष श्री प्रसन्ना बोरोले,श्री सलीम तडवी, श्री गोविंदा लोखंडे, श्री आशिष पवार, श्री संतोष मराठे,संचालक श्री प्रशांत साखरे, सौ रूपाली पाटील ,सौ स्वाती फिरके ,श्री प्रफुल्ल सरोदे,श्री वना महाजन,श्री धनंजय काकडे, श्री अविनाश घुगे तसेच तज्ञ संचालक श्री महेंद्र रामोसे ,श्री मोहन पालवे तसेच संस्थेचे कर्मचारी श्री सचिन पाटील श्री सागर जावळे, श्री महेश पाटील तसेच सहयोगी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add