Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्राच्या’ नवीन इमारतीचा पोलीस अधीक्षक कार्यालयात भूमिपूजन सोहळा

जळगाव

‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्राच्या’ नवीन इमारतीचा पोलीस अधीक्षक कार्यालयात भूमिपूजन सोहळा

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 10, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

‘भरोसा सेल’च्या इमारतीचे भूमिपूजन महिला व बालकल्याणार्थ मोठे पाऊल

जळगाव: जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि तत्पर तक्रार निवारणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्राच्या’ नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा दिनांक ०८ मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात उत्साहात संपन्न झाला.सदर इमारतीचे भूमिपूजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यामध्ये त्यांनी या केंद्राच्या उभारणीचा उद्देश स्पष्ट केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी केले.

याप्रसंगी पोलीस प्रशासन: मा.डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक जळगाव) अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव), नितीन गणापुरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग), सतीश गोराडे (पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा),  राहुल गायकवाड (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा) तसेच जळगाव शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

प्रकल्पाचे तांत्रिक व आर्थिक तपशील

उद्देश: पीडित महिला आणि बालकांना एकाच छताखाली कायदेशीर साहाय्य, मानसिक समुपदेशन आणि पोलीस मदत उपलब्ध करून देण्यासाठी हे केंद्र आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असेल.

तरतूद व निधी: या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून एकूण २९७ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली आहे.

अंमलबजावणी यंत्रणा: या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे.

प्रकल्प नियोजन: सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राहुल दे. पाटील आणि उपविभागीय अधिकारी श्री. सुनिल ल. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटदार मे. जगन्नाथ इन्फ्रा कंपनी, चाळीसगाव यांच्यामार्फत हे काम पूर्ण केले जाणार आहे.जळगाव पोलीस दलातर्फे राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने एक मैलचा दगड ठरणार असून, पालकमंत्री महोदयांनी पोलीस प्रशासनाच्या या सकारात्मक पुढाकाराचे विशेष कौतुक केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add