Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»एकनाथ खडसे यांच्या वाढ ! ‘त्या’ प्रकरणाची SIT कडून होणार चौकशी, महसूलमंत्र्यांनी दिले आदेश..

ताज्या बातम्या

एकनाथ खडसे यांच्या वाढ ! ‘त्या’ प्रकरणाची SIT कडून होणार चौकशी, महसूलमंत्र्यांनी दिले आदेश..

Editorial DeskBy Editorial DeskMarch 12, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खडसे यांच्याविरोधात एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत.

जळगाव । माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खडसे यांच्याविरोधात एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीसाठी सहा विभागांतील अधिकारी सहभागी होणार असून संबंधित प्रकरण नऊ गावांतील जमिनींशी जोडलेले असल्याचे सांगितले जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणाबाबत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण सुरु आहे. 25 जानेवारी 2022 मध्ये या संदर्भात राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. यासाठी 56.80 हेक्टर जमिन भूसंपादन करण्याचा निर्णय सरकारने 13 जानेवारी 2023 ला घेतला होता. दरम्यान हायवे होतोय याचा साक्षात्कार काही लोकांना झाला. त्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाडे लावून मोबदला घेण्याचा प्रयत्न झाला. नोटीस निघाल्यानंतर त्या जमिनीवर पूर्णपणे शासनाचा उतारा लागतो. उताऱ्यावर नोंद लागल्यानंतर मूळ मालकाचे सर्व अधिकारी संपुष्टात येतात.

मात्र मोठा मोबदला लुटण्यासाठी एकनाथ खडसे यांनी १४ दिवसांनी २७ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचित झालेल्या जमिनीपैकी काही जमीन खरेदी केलीय १५ लाख २२ हजार रुपयांचे खरेदीखत दाखवले, साडेतीन वर्षानंतर त्यांच्या लाभात हस्तांतरण केले एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही, तर खरेदीखतामध्ये ही जमीन लागवडीयोग्य जमीन असल्याचे निदर्शनास आले. खरेदी आधी तिथे झाडे लावली. त्याच्या मोबदल्यासाठी पाठपुरावा सुरु केला. २०२२ मध्ये ही जमीन खरीप होती, तिथे कापसाचे पीक घेतले जाते. मात्र तिथे 8 वर्षांपासून झाडे असल्याचं दाखवण्यात आलं, ही शासनाची फसवणूक आहे. असं यावेळी मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महसूलमंत्री बावनकुळेंकडून एसआयटी चौकशीचे आदेश
दरम्यान आता या प्रकरणात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली जाणार आहे. या पथकाला तीन महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या तपासात सहा विभागांतील अधिकारी सहभागी होणार असून संबंधित अहवाल सभागृहात मांडण्यात येणार असल्याचेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add