Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शासनाच्या वतीने भांडी संच वाटप केंद्रावर ‘केवायसी’च्या नावाखाली फसवणूक; कामगार महिलांचा संताप

ताज्या बातम्या

शासनाच्या वतीने भांडी संच वाटप केंद्रावर ‘केवायसी’च्या नावाखाली फसवणूक; कामगार महिलांचा संताप

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 13, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

बांधकाम कामगार महिलांना वाटप करण्यात येणाऱ्या गृह उपयोगी वस्तूंच्या (भांडी सेट) वितरण केंद्रावर संभ्रम

जळगाव प्रतिनिधी । शासनाच्या वतीने बांधकाम कामगार महिलांना वाटप करण्यात येणाऱ्या गृह उपयोगी वस्तूंच्या (भांडी सेट) वितरण केंद्रावर आज संभ्रम आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या मागील गोडाऊनवर सुरू असलेल्या या वाटपात कर्मचाऱ्यांनी ‘केवायसी अपडेट’ करण्याच्या बहाण्याखाली लाभार्थी महिलांकडून १०० ते ३०० रुपयांची बेकायदेशीर मागणी केल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे.

सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी झालेली होती. शहरातील तसेच परिसरातील शेकडो महिलांनी पहाटे ६ वाजेपासूनच रांगेत उभे राहून आपला नंबर येण्याची प्रतीक्षा केली. या गर्दीत वयोवृद्ध महिलांचा तसेच अंगावर लहान बाळे असलेल्या मातांचा समावेश होता. रणरणत्या उन्हात तासनतास उभ्या राहून वाट पाहणाऱ्या या महिलांना केवायसीच्या नावाखाली पैसे मागितल्याचे समोर आले.

लाभार्थ्यांच्या तक्रारींनुसार, “आम्ही हक्काच्या वस्तू घेण्यासाठी आलो आहोत, पण कर्मचारी शंभर ते तीनशे रुपये मागत आहेत. ही रक्कम नेमकी कशासाठी आहे, याचे कोणतेही स्पष्टीकरण मिळत नाही,” असे महिलांनी सांगितले. दुसरीकडे, केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि “आम्ही कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत,” असे स्पष्ट केले.प्रचंड गर्दी आणि वाहनांच्या व्यवस्थेअभावी वाटप केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महिलांची सुरक्षा आणि सुविधा यावर कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे दिसून आले. गरीब कष्टकरी महिलांकडून अशा प्रकारे पैसे मागितले जात असल्यास प्रशासनाने त्वरित सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी लाभार्थी व नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add