Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»संशयित मुलावर जीवघेणा हल्लासाखरी गावात खडका प्रकरणाची पुनरावृत्ती ; पोलिसांशी धक्काबुक्की

ताज्या बातम्या

संशयित मुलावर जीवघेणा हल्लासाखरी गावात खडका प्रकरणाची पुनरावृत्ती ; पोलिसांशी धक्काबुक्की

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 24, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

खडका परिसरातील गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्याचा संशय निर्माण करणारी गंभीर घटना घडली

फेकरी ता.भुसावळ तालुक्यातील साकरी गावात खडका परिसरातील गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्याचा संशय निर्माण करणारी गंभीर घटना घडली आहे. एका संशयित अल्पवयीन मुलास जिवंत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्तींनी संबंधित हेमराज तायडे रा . कठोरा या युवकावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असताना काही स्थानिकांनी त्यांच्याशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. तसेच अरेरावीची भाषा वापरत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी संबंधितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांशी गैरवर्तन करणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


जखमी मुलास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.दरम्यान, साकरी गावात तणावपूर्ण शांतता असून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पो. नि महेश गायकवाड यानी करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add