Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्या रक्षक गायकवाड जाळ्यात अडकला.

ताज्या बातम्या

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्या रक्षक गायकवाड जाळ्यात अडकला.

Editorial DeskBy Editorial DeskMarch 31, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पूर्व वन विभागाला मार्च एंडिंगचा जोरदार दणका.

यावल : लोकसेवक भैय्यासाहेब भिमराव गायकवाड, व्यवसाय वनरक्षक, आगार रक्षक यावल ,नेम – वनपरिक्षेत्र,अधि. कार्यालय, यावल पुर्व, ह. रा. फॉरेस्ट क्वॉर्टर, यावल यांचेवर लाच मागणी प्रकरणी कारवाई केले बाबत.यातील मुळ तक्रारदार त्यांचेकडील दोन बोलेरो पिकअप वाहनाद्वारे यावल तालुक्यात अंजाळे,पाडळसे व आजुबाजुच्या परिसरामध्ये ट्रिपप्रमाणे लाकुड वाहतुकीचा व्यवसाय करतात.तक्रारदार यांच्या दोन बोलेरो पिकअप गाडयाने लाकुड वाहतुक सुरळीत चालु देवुन कोणतीही कारवाई न करण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे लोकसेवक भैय्यासाहेब भिमराव गायकवाड, वनरक्षक, आगार रक्षक यावल ,

वाजवीपेक्षा जास्त आत्मविश्वास ( ओव्हर कॉन्फिडन्स ) असलेल्या यावल पूर्व वन क्षेत्रपालाच्या कार्यक्षेत्रातील आगर रक्षक गायकवाड लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्या जाळ्यात अडकला.

नेमणूक –वनपरिक्षेत्र, अधि. कार्यालय,यावल पुर्व यांनी दरमहा १०,०००/- रूपये लाचेची मागणी केली. म्हणुन तक्रारदार यांनी वनरक्षक भैय्यासाहेब भिमराव गायकवाड यांचे विरूध्द दि. २०/०३/२०२६ रोजी ला. प्र. वि. जळगाव यांचेकडे लाच मागणी केल्याची तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. २०/ ०३ / २०२६ रोजी लाचमागणी पडताळणी कारवाई आजमावली असता लोकसेवक भैय्यासाहेब भिमराव गायकवाड यांनी तक्रारदार यांचेकडे तक्रारदार यांच्या दोन बोलेरो पिकअप गाडयाने लाकुड वाहतुक सुरळीत चालु देवुन कोणतीही कारवाई न करण्याकरीता पंचासमक्ष १०,०००/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडअंती ९,००० /- रूपये लाच रक्कमस्विकारण्याची तयारी दर्शविली होती.तक्रारदार हे लोकसेवक भैय्यासाहेब भिमराव गायकवाड यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम त्यांना देण्यासाठी गेले असता आलोसे तथा गायकवाड यास संशय आल्याने त्यांनी सदरची लाचेची रक्कम स्विकारली नाही.करीता आलोसे यांच्याविरूध्द लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गायकवाड यांच्या अंगझडतीत ९,०४० /- रूपये रोख रक्कम व दोन मोबाईल १) सॅमसंग अल्ट्रा २५ किं. अं-१,१०,०००/- रूपये व २) आईटेल कंपनीचा मोबाईल फोन किं.अं. १,०००/- रूपये मिळुन आले असुन मोबाईल हॅन्डसेट तपासणी करून आवश्यकता असल्यास जप्त करण्याची तजविज ठेवली आहेत.पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकुर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि., जळगांव. सापळा अधिकारी सापळा पथकमो.नं. ९७०२४३३१३१, ७५८८६६१०६४. श्रीमती रेश्मा अवतारे,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार, कॅम्प – ला. प्र. वि. जळगांव.पोहेकॉ/बाळु मराठे, पोकॉ/ राकेश दुसाने, श्रेपोउपनिरी/ सुरेश पाटील, नेमला. प्र. वि. जळगांवतपास अधिकारी- हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव भारत तांगडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक.माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
सुनिल दोरगे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र,नाशिक.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add