Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»गावठी कट्टा विक्रीचा प्रयत्न उधळला; मुद्देमालासह जळगावात दोघे जेरबंद

ताज्या बातम्या

गावठी कट्टा विक्रीचा प्रयत्न उधळला; मुद्देमालासह जळगावात दोघे जेरबंद

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 1, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जिवंत काडतुसे, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जळगाव । जळगाव शहरात बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून देशी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतुसे, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर रोड परिसरात काही व्यक्ती कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने नियोजन करून संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित इसम घटनास्थळी आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली असता त्यांच्या जवळून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे आढळून आली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून मोटारसायकल आणि मोबाईल फोनसह एकूण सुमारे १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनेनंतर आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या शस्त्रांचा पुरवठा कुठून होत होता याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add