Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»कचरा डेपो प्रश्नावर जळगाव महापौरांचा कडक पवित्रा

ताज्या बातम्या

कचरा डेपो प्रश्नावर जळगाव महापौरांचा कडक पवित्रा

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 2, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

घनकचरा डंपिंग ग्राऊंडच्या समस्यांवर अखेर निर्णायक हालचाल सुरू झाली आहे.

जळगाव प्रतिनिधी । शहराच्या स्वच्छता आणि आरोग्याशी थेट संबंध असलेल्या आव्हाणे शिवारातील घनकचरा डंपिंग ग्राऊंडच्या समस्यांवर अखेर निर्णायक हालचाल सुरू झाली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले असून, कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या बैठकीत कचरा डेपोतील कंपाऊंड वॉल, रॅम्प आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासकीय दिरंगाई आणि तांत्रिक अडचणींमुळे ही कामे दीर्घकाळ रखडली होती. शहरात उघड्यावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांकडून तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

बैठकीत श्री श्री इन्फ्रा या मक्तेदारांनी कामातील अडचणी स्पष्ट करताना सांगितले की, सुमारे ८५ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात ६ मीटरपर्यंत कचरा साचलेला आहे. जमिनीचा उंच-सखलपणा आणि कचऱ्याचा थर यामुळे जागा समतल केल्याशिवाय कंपाऊंड वॉल आणि रॅम्पचे काम करणे शक्य नाही. त्यामुळे प्रथम बायोमायनिंग आणि कचरा हटविण्याचे काम प्राधान्याने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहर अभियंता योगेश बोरोले यांनी सांगितले की, मूळ अंदाजपत्रकात खोदकाम आणि कचरा वाहतुकीचा समावेश नव्हता. त्यामुळे शिल्लक निधीतून वाढीव कामासाठी सुधारित प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पुढील २५ दिवसांत बायोमायनिंग पूर्ण करण्याचे आणि मनपाच्या यंत्रणेद्वारे कचरा बाजूला करण्याचे निर्देश दिले.

महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि दुर्गंधी रोखण्यासाठी कंपाऊंड वॉलचे काम प्राधान्याने सुरू करणे गरजेचे आहे. मनपाने जागा उपलब्ध करून दिल्यानंतर मक्तेदारांनी एक दिवसही विलंब न करता काम सुरू करावे, असे आदेश त्यांनी दिले. रॅम्पच्या कामाला स्थानिक विरोध झाल्यास पोलीस बंदोबस्तात काम पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.या बैठकीस उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सहाय्यक आयुक्त उदय पाटील, शहर अभियंता योगेश बोरोले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add