Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»वाळूच्या डंपरची धडक डी. फार्मसी शिकणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

ताज्या बातम्या

वाळूच्या डंपरची धडक डी. फार्मसी शिकणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 3, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

अपघात घडून एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील दसेगाव फाट्याजवळ दि. २ एप्रिल रोजी दुपारी भीषण अपघात घडून एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भरधाव वाळूने भरलेल्या डंपरने ऍक्टिव्हा दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अपघातात डी. फार्मसीचे शिक्षण घेत असलेली चंचल नामदेव लांडगे अंदाजे वय( १९ )हिचा जागीच मृत्यू झाला. तिच्यासोबत असलेली मैत्रीण वैष्णवी वैभव चौधरी अंदाजे वय (१९) गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.


दरम्यान, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संतप्त नागरिकांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन करत निषेध नोंदवला. तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात वातावरण तापले असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add