Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»टॅब चोरी करून मागितली बारा लाखाची खंडणी

ताज्या बातम्या

टॅब चोरी करून मागितली बारा लाखाची खंडणी

Editorial DeskBy Editorial DeskApril 5, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

अश्लील व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी

नाशिक येथील सातपूर परिसरात अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा सातपूर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत पर्दाफाश करत चार पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. ज्येष्ठ नागरिक असलेल्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार संशयित आरोपींनी फिर्यादीचा एक टॅब चोरी करून त्यामधील मैत्रीणीसोबतचे वैयक्तिक आणि संवेदनशील अश्लील व्हिडिओ आणि फोटो मिळवले.

त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील दहा हजार रुपये नुकतेच देण्यात आले होते. तर गुरुवारी (दि.2) सायंकाळी 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र संशयित टोळी पैसे स्वीकारतानच पोलिसांच्या हाती लागली.

आरोपींना दबाव टाकण्यासाठी फिर्यादीकडून 10 हजार रुपये उकळले आणि त्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हॉटसअ‍ॅपवर पाठवून धमकी अधिक तीव्र केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण अहिरे यांनी तात्काळ पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट 2 अशी दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.

तपासदरम्यान आरोपी आडगाव शिवारातील दहावा मैल परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पोलिसांना बघताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सर्व बाजूनी घेराव घालत सिनेस्टाईल पाठलाग त्यांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात आणखी कोणी आहे का याचा सखोल तपास पोलीस करत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add