Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»साकळी येथे दत्त मंदिराजवळ घडली घटना

ताज्या बातम्या

साकळी येथे दत्त मंदिराजवळ घडली घटना

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 5, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

वादळाने झाड कोसळले; महिला थोडक्यात बचावली

येथे गेल्या दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडतो आहे. या दरम्यान दि. २ रोजी रोजी सायंकाळी झालेल्या वादळामुळे साकळी येथील चावडी परिसरातील दत्त मंदिराजवळील भले मोठे उंबराचे झाड अचानक मुळासकट उन्मळून जमिनीवर पडले. या घटनेत मंदिरात देवाचे दर्शन घेत असलेल्या महिला सौ. रोहिणी योगेश नेवे (वय ४५) या सुदैवाने थोडक्यात बचावल्या आहे. त्या मंदिर ठिकाणी एकट्याच भाविक उपस्थित होत्या. सदर घटना सायंकाळी ७ वाजेदरम्यान घडली आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रचिती या घटनेवरून आला आहे.

सौ. रोहीणी नेवे या पशुवैद्यकिय कर्मचारी वाय. जी. नेवे यांच्या पत्नी आहे. ज्या मंदिर परिसरात जी घटना घडली त्या दत्त मंदिरात रोज संध्याकाळी पूजा- आरती होत असते व परिसरातील अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित राहून दर्शन घेत असतात. यात महिलांची संख्या जास्त असते. घटने दरम्यान सौ. रोहिणी नेवे यांनी देवा पुढे माथा ठेऊन दर्शन घेत असताना मंदिराच्या बाजूचे हे भले मोठे उंबराचे झाड त्यांच्या अगदी काही अंतरावर पडले. झाड पडल्याने भाविक महिलेला काही दुखापत झाली नाही व मंदिराचे सुद्धा काही नुकसान झाले नाही. झाड मंदिराच्या बाजूला लावलेल्या स्टीलच्या ग्रील वर पडले.

सदर घटनेच्या वेळी प्रत्यक्षदर्शी महिलांनी घटना घडल्यावर एकच आरडाओरड केली व रोहिणी नेवेंना पटकन बाजूला होण्यास सांगितले. पडलेल्या झाडाने मंदिराचा संपूर्ण परिसर व्यापून टाकलेला होता. मात्र रोहिणी नेवे परिस्थिती पाहता घाबरून न राहता अगदी न डगमगता हिमंती दुसऱ्या बाजूच्या स्टीलच्या ग्रील वर चढून त्या ठिकाणाहून सुखरूपपणे बाहेर पडल्या. या घटनेने परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्यक्षदर्शी महिलांनी घडलेल्या घटनेची माहिती सांगितली. भाविकांच्या गर्दीच्या वेळी सदरचे झाड पडले असते तर मोठा अनर्थ घडला असता एवढे मात्र निश्चित आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add