Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»कुऱ्हा पानाचे येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसमोरच मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या

ताज्या बातम्या

कुऱ्हा पानाचे येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसमोरच मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 5, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

बाजाराच्या वार्षिक लिलावावेळी मोठा गोंधळ उडाला

भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावात ग्रामपंचायतीच्या आठवडा बाजाराच्या वार्षिक लिलावावेळी मोठा गोंधळ उडाला असून, दारूच्या नशेत आलेल्या काही इसमांनी थेट लिलाव प्रक्रियेत हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांसमोरच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ग्रामपंचायत अधिकारी राहुल अरुण चौधरी यांच्या आदेशानुसार १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत आवारात लिलाव प्रक्रिया सुरू होती. यावेळी प्रशासक दुर्गाबाई सुरेश शिंदे, सदस्य जीवन प्रल्हाद पाटील, दत्तू जानकीराम बाविस्कर आणि किशोर अरुण कोळी उपस्थित होते.


दरम्यान, सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास स्वानंद त्र्यंबक पालोदे, सागर रामचंद काकडे व एक अनोळखी इसम दारूच्या नशेत लिलावस्थळी दाखल झाले. “अतिक्रमण का काढले नाही?” असा सवाल करत त्यांनी लिलाव थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करत वातावरण तापवले.

प्रशासक दुर्गाबाई शिंदे व सदस्य जीवन पाटील यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त इसमांनी त्यांच्यावरच हल्ला चढवला. जीवन पाटील यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या हाताला दुखापत करण्यात आली. तसेच प्रशासकांचे पती सुरेश काशीनाथ शिंदे यांनाही मारहाण करून त्यांचे कपडे फाडण्यात आले. इतकेच नव्हे तर संबंधितांनी “जीवे मारण्याच्या” धमक्याही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात मोठा अडथळा निर्माण झाला असून, सार्वजनिक सुरक्षेलाही धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add