Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»मुक्ताईनगर हादरले: शेतात आढळले अर्भकाचे प्रेत,अज्ञातावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मुक्ताईनगर हादरले: शेतात आढळले अर्भकाचे प्रेत,अज्ञातावर गुन्हा दाखल

Editorial DeskBy Editorial DeskApril 6, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कोऱ्हाळा परिसरात उघडकीस आली आहे.

मुक्ताईनगर प्रतिनिधी । माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कोऱ्हाळा परिसरात उघडकीस आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःचे पाप लपवण्यासाठी किंवा अन्य कारणास्तव एका नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला शेतातील काटेरी झुडपात सोडून दिले. उघड्यावर टाकल्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यात कोऱ्हाळा गावच्या शिवारातील वामन अमृत धाडे यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या काटेरी झुडपात एक नवजात स्त्री अर्भक मृतावस्थेत आढळून आले. ही घटना ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. पोहेकॉ श्रावण दशरथ भिल्ल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

सारोळा ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी होणार; आ. किशोर पाटलांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

September 16, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात ‘नमो उद्यान’चे लोकार्पण

September 16, 2026

३४ हजार न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; जळगावात काळ्या फिती लावून निषेध

September 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add