Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»व्यवस्थापनासाठी कुंभमेळ्यात गर्दी देवळाली- ओढा रेल्वे स्थानक

ताज्या बातम्या

व्यवस्थापनासाठी कुंभमेळ्यात गर्दी देवळाली- ओढा रेल्वे स्थानक

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 6, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

एकाच वेळी येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन होणार आहे.

प्रतिनिधी I भुसावळ :विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी वरिष्ठ शाखा अधिका-यांसह नाशिक रोड, देवळाली आणि ओढा या रेल्वे स्थानकांची पाहणी करून कुंभमेळा कामाचा आढावा घेतला. राज्याच्या मुख्य सचिवांनी रेल्वेच्या कामांची पाहणी केली. देवळाली आणि ओढा स्थानकामुळे नाशिकरोड स्थांनकावरील गर्दीचा ताण कमी करून तो दोन स्थानकात विभागाला जाणार आहे. एकाच वेळी येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन होणार आहे.

कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री,  रेल्वे व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देवळाली, नाशिक रोड व ओढा येथे भाविकांसाठी कामे सुरू आहेत. या कामांची पाहणी करून अग्रवाल यांनी कामांची प्रगती, गुणवत्ता व वेळेत पूर्णत्वाबाबत आढावा घेतला. कुंभमेळ्यात वाढत्या गर्दीचा विचार करून प्लॅटफॉर्म विस्तार, प्रवासी सुविधा उन्नतीकरण, सुरक्षा व्यवस्था तसेच स्थानक परिसरातील वाहतूक नियोजन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अधिका-यांशी चर्चा करून कामांची गती वाढविणे, समन्वय राखणे व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सूचना अग्रवाल यांनी केल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add