Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»वांजोळा चौक अपघातांचा सापळा; महिनाभरात १० अपघात

जळगाव

वांजोळा चौक अपघातांचा सापळा; महिनाभरात १० अपघात

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJune 10, 2026Updated:June 10, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

वरणगाव प्रतिनिधी | वांजोळा चौक परिसरात गेल्या एका महिन्यात तब्बल १० अपघात घडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे हा चौक वाहनचालकांसाठी अक्षरशः अपघातांचा सापळा बनत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, चौकातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी, वेगाने धावणारी वाहने, अपुरे दिशादर्शक फलक, तसेच काही ठिकाणी रस्त्याची खराब अवस्था यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची मोठी गर्दी होत असल्याने धोका अधिक वाढत आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती मिळाली आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. चौकात गतिरोधक, सिग्नल व्यवस्था, रस्ते सुरक्षा फलक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ६ ठिकाणी छापे टाकून दारू व सट्ट्याचे अड्डे केले जमीनदोस्त!

June 10, 2026

जळगाव मनपा आयुक्तांची तडकाफडकी बदली; ज्ञानेश्वर ढेरेंच्या जागी आदित्य जीवने नवे आयुक्त!

June 9, 2026

मंदिरात चोरी करणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात: घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

June 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add