Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»ब्रेकिंग : भरधाव डंपरने दुचाकी ला उडविले वृद्ध ठार; चार वर्षाची चिमुकली बचावली !

क्राईम

ब्रेकिंग : भरधाव डंपरने दुचाकी ला उडविले वृद्ध ठार; चार वर्षाची चिमुकली बचावली !

Editorial DeskBy Editorial DeskJune 10, 2026Updated:June 10, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंप्रीसेकम शेती शिवार रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी आलेल्या एका डंपरने मागच्या बाजूला जात असताना दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकी डंपरखाली दाबल्या गेल्याने आजोबांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, सुदैवाने त्यांची चार वर्षांची नात या अपघातातून सुखरूप बचावली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून संतप्त गावकऱ्यांनी डंपरला आग लावून पेटवून दिले.

​आनंदा मुकुंद पाटील (वय ५५, रा. तपत कठोरा) असे मृत वृद्धाचे नाव आहे. आनंदा पाटील हे आपली चार वर्षांची नात परी हिच्यासह शेतातून (MH १९ B Q ९३२०) या दुचाकीने घरी परतत होते. याच दरम्यान, पिंप्रीसेकम रस्त्यावरील अरुंद मार्गावर मुरूम टाकण्यासाठी आलेले डंपर (MH १९ EU ३७३७) चालक मागे घेत होता. रस्त्याचा अंदाज न आल्याने डंपरने पाटील यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की आनंदा पाटील डंपरच्या चाकाखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या शेजारी असलेली चिमुरडी परी मात्र या अपघातातून बालंबाल बचावली.

​अपघाताची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच संतप्त गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. डंपरखाली अडकलेली दुचाकी आणि आनंदा पाटील यांना बाहेर काढून तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कायदा हातात घेत डंपरला आग लावली. माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत डंपरची आग विझवली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add