Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»प्रथा-परंपरांना विधायकतेची जोड; अधिक मासानिमित्त ‘जागृती वाचनालयाला’ पुस्तकांचे अनोखे वाण!

जळगाव

प्रथा-परंपरांना विधायकतेची जोड; अधिक मासानिमित्त ‘जागृती वाचनालयाला’ पुस्तकांचे अनोखे वाण!

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJune 10, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​भडगाव प्रतिनिधी | अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मासात जावई-लेकीचे कौतुक आणि विविध वस्तूंचे वाण देण्याची जुनी परंपरा आहे. आजकाल आईला वाण देण्याचा नवा ट्रेंडही पाहायला मिळत आहे. मात्र, याच धार्मिक प्रथा-परंपरांना सामाजिक आणि विधायक कार्याची जोड देत, धुळे येथील सौ. नेहा मालपूरे-शेटे यांनी एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. आपल्या वाचन प्रवासाची जिथे सुरुवात झाली, त्या भडगाव येथील ‘जागृती वाचनालयाला’ आणि वाचक परिवाराला पुस्तकांचे मौल्यवान वाण देऊन त्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

​अधिक महिन्यात दानाला विशेष महत्त्व असून सामान्यतः लोक खाण्याचे पदार्थ, कपडे, सोने किंवा चांदीचे वाण देतात. परंतु, “पुस्तके देणे हे सोने-चांदी देण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण त्यांचे मूल्य वाढत नसले तरी, ती वाचणारा माणूस मात्र स्वतः अमूल्य बनतो,” या उदात्त विचाराने प्रेरित होऊन नेहा मालपूरे यांनी हा निर्णय घेतला. आजच्या स्पर्धात्मक युगात माणसाने वाचून समृद्ध व्हावे आणि समाजातील वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने त्यांनी वाचनालयाला अतिशय वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके भेट दिली.

​शेटे दांपत्याचा वाचनालयातर्फे गौरव
सौ. नेहा मालपूरे-शेटे आणि श्री. अनिल शेटे यांच्या या अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रमाबद्दल जागृती वाचनालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अतुल परदेशी, उपाध्यक्ष सुरेश भंडारी, सचिव प्रा. डॉ. दीपक मराठे, संचालक गोकुळ चौधरी, प्रा. डॉ. दिनेश तांदळे, मंदार कासार आणि ग्रंथपाल सायली निशानदार आदी मान्यवर उपस्थित होते. शेटे दांपत्याच्या या वैचारिक आणि विधायक उपक्रमाचे सध्या सर्वच स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना अटक: जळगाव तालुका पोलिसांची कारवाई!

June 11, 2026

जळगावात रंगला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा थरार; ५७२ खेळाडूंचा सहभाग!

June 11, 2026

​मानराज पार्कजवळ कार-रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालकासह महिला प्रवासी गंभीर जखमी!

June 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add