Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगावात लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण; मान्यवरांची मांदियाळी

जळगाव

जळगावात लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण; मान्यवरांची मांदियाळी

Editorial DeskBy Editorial DeskJuly 8, 2026Updated:July 8, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी विद्यालयात लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा उत्साहपूर्ण आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभहस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, महापौर दीपमाला काळे, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते धनंजय चौधरी तसेच कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनात केलेल्या कार्याच्या स्मृतींना या पुतळ्याच्या माध्यमातून उजाळा मिळाला. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

या अनावरण सोहळ्यामुळे विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add