Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»यावलमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; राष्ट्रीय महामार्गावर भलेमोठे वडाचे झाड कोसळले

जळगाव

यावलमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; राष्ट्रीय महामार्गावर भलेमोठे वडाचे झाड कोसळले

Editorial DeskBy Editorial DeskAugust 1, 2026Updated:August 1, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

यावल | प्रतिनिधी
यावल शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यावल शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावरील आठवडे बाजार परिसरात शुक्रवारी सकाळी एक भलेमोठे वडाचे झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही.

शुक्रवार हा यावलचा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने परिसरात नागरिकांची वर्दळ होती. झाड कोसळताना जवळ उभ्या असलेल्या दोन ऑटो रिक्षांचे नुकसान झाले. मात्र, चालक आणि नागरिक वेळीच बाजूला झाल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक विकास जंजाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मजुरांच्या मदतीने झाडाचे तुकडे करून रस्त्यावरून हटविण्यात आले. त्यामुळे काही वेळातच वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

दरम्यान, यावल ते फैजपूर या राष्ट्रीय महामार्गालगत अनेक मोठी झाडे धोकादायक स्थितीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सततच्या पावसामुळे ही झाडे कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून धोकादायक झाडांवर योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add