Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»रावेर आगाराला पाच नवीन एसटी बसेस; आमदार नंदकिशोर महाजन यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव

रावेर आगाराला पाच नवीन एसटी बसेस; आमदार नंदकिशोर महाजन यांच्या पाठपुराव्याला यश

Editorial DeskBy Editorial DeskAugust 4, 2026Updated:August 4, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

रावेर | प्रतिनिधी
रावेर बस आगाराला पाच नवीन एसटी बसेस मंजूर होऊन आगारात दाखल झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार नंदकिशोर महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय प्रत्यक्षात आला असून रावेर शहरासह पूर्व भाग आणि मध्य प्रदेश सीमेलगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

रावेर आगाराला नवीन बसेस मिळाव्यात, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी यासाठी सातत्याने आवाज उठवला होता. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोरकर यांनीही वेळोवेळी नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार नंदकिशोर महाजन यांनी राज्य परिवहन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर रावेर आगाराला पाच नवीन बसेस मिळाल्या.

या नवीन बसेस सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि नियमित होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसह शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार असून अनेकांनी आमदार नंदकिशोर महाजन यांचे आभार व्यक्त केले आहेत.

दरम्यान, आगारात दाखल झालेल्या या बसेसचे लवकरात लवकर लोकार्पण करून त्या तातडीने प्रवाशांच्या सेवेत दाखल कराव्यात, अशी मागणी प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. नवीन बसेस सुरू झाल्यानंतर रावेर आगाराच्या वाहतूक सेवेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add