Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»यावलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला सर्वानुमते मंजुरी

जळगाव

यावलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला सर्वानुमते मंजुरी

Editorial DeskBy Editorial DeskAugust 6, 2026Updated:August 6, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

यावल प्रतिनिधी | यावल नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र सभेपूर्वी मुख्याधिकारी अनुपस्थित राहणार असल्याच्या चर्चेमुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत मुख्याधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुख्याधिकारी सभेला उपस्थित राहिले आणि कामकाजाला सुरुवात झाली.

यावल नगर परिषदेच्या सभागृहात २९ विषयांवर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी मुख्याधिकारी निशिकांत गवई सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुख्याधिकारी सभागृहात दाखल होताच नगरसेवकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत त्यांना खडेबोल सुनावले.

यानंतर सभेत शहरात भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पुतळ्यासाठी योग्य जागेची निवड सर्व नगरसेवकांच्या सहमतीने करण्यात यावी, अशी सूचना सभेत करण्यात आली.

दरम्यान, प्रलंबित चतुर्थ वार्षिक फेर कर आकारणीच्या कामावरही जोरदार चर्चा झाली. काम पूर्ण न करता संबंधित कंत्राटदाराला तब्बल २८ लाख रुपयांचे देयक कसे अदा करण्यात आले, तसेच त्यासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला.

या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. याशिवाय शहरातील विविध विकासकामांसह एकूण २९ विषयांना सर्वानुमते मंजुरी देत विशेष सभा संपन्न झाली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add