Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जामनेरमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; विशेष जनजागृती अभियान

जळगाव

जामनेरमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; विशेष जनजागृती अभियान

Editorial DeskBy Editorial DeskAugust 7, 2026Updated:August 7, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जामनेर प्रतिनिधी |  जामनेरमध्ये न्यू इंग्लिश मीडियम स्कूल येथे महाराष्ट्र सायबर जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष सायबर अवेअरनेस कार्यक्रम उत्साहात पार पडला. डिजिटल युगात वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

सायबर वॉरियर्स विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी फिशिंग लिंक, बनावट वेबसाइट, सोशल मीडिया फ्रॉड, ओटीपी फसवणूक, सायबर बुलिंग, फोटो मॉर्फिंग, डेटा चोरी आणि ऑनलाइन गेमिंगमधील धोके याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली. मजबूत पासवर्ड, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि वैयक्तिक माहितीची गोपनीयता राखण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

यावेळी Quick Heal Foundation तर्फे सायबर सुरक्षा मार्गदर्शक पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. शाळेचे प्राचार्य एस. एस. पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी स्वतः सुरक्षित राहून इतरांनाही सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्याचे आवाहन केले. आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सुरक्षित डिजिटल नागरिक बनण्याची शपथ घेतली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add