Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»नेहरू चौक मित्र मंडळातर्फे ‘जळगावच्या राजा’चे पाटपूजन उत्साहात

जळगाव

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे ‘जळगावच्या राजा’चे पाटपूजन उत्साहात

Editorial DeskBy Editorial DeskAugust 9, 2026Updated:August 9, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी : श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे ‘जळगावचा राजा’ श्री गणपतीच्या पाटपूजन व मंडप सोहळ्याचे आयोजन रविवारी (९ ऑगस्ट) सायंकाळी मोठ्या उत्साहात करण्यात आले. महानगरपालिकेच्या इमारतीखाली झालेल्या या सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती होती.
यंदा मंडळाचे ४३ वे वर्ष असून धीरज व रुचिता अग्रवाल यांच्या हस्ते पवित्र मंत्रघोषात गणपतीचे पाटपूजन करण्यात आले. त्यानंतर श्री गणपतीची महाआरती करण्यात आली.

यावेळी आमदार राजूमामा भोळे, डॉ. गौरव महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्यामकांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते नाना सोनवणे, उद्योजक नवनीतभाई पटेल, किशोरभाई पटेल तसेच मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाआरतीनंतर शिवगंध संस्थेच्या ढोल पथकाने दमदार सादरीकरण करत वातावरणात उत्साह निर्माण केला. ढोल-ताशांच्या गजरात भाविकांनी जल्लोष केला. यावेळी नेहरू चौक रांगोळी व फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता. महिला व पुरुष भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली
कार्यक्रमाचे आभार पियुष गांधी यांनी मानले. सोहळा यशस्वी करण्यासाठी नेहरू चौक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add