Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»व्हिडीओ कॉलवर पोलिस असल्याची भीती दाखवून लुबाडणाऱ्यांपासून सावध; टीना पाटील यांचा विद्यार्थ्यांना इशारा!

जळगाव

व्हिडीओ कॉलवर पोलिस असल्याची भीती दाखवून लुबाडणाऱ्यांपासून सावध; टीना पाटील यांचा विद्यार्थ्यांना इशारा!

Editorial DeskBy Editorial DeskAugust 12, 2026Updated:August 12, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

यावल प्रतिनिधी | व्हिडीओ कॉल करून आपण पोलिस अधिकारी असल्याचे भासवणे, भीती दाखवणे आणि ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र, कोणत्याही कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ अशी संकल्पना नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कॉल आल्यास घाबरून न जाता तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञ टीना पाटील यांनी केले.

सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्या मंदिर शाळेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सायबर शिक्षा व सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात सायबर तज्ज्ञ टीना पाटील आणि दर्शना चौधरी यांनी ‘हॅकर मास्क’च्या माध्यमातून सायबर फसवणुकीचे प्रात्यक्षिक सादर केले. बनावट लिंक, आकर्षक संदेश, फोन कॉल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना कशाप्रकारे जाळ्यात ओढले जाते, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

ओटीपी, यूपीआय फिशिंग, क्यूआर कोड, केवायसीच्या नावाने होणारी फसवणूक, फोटो मॉर्फिंग, बनावट सोशल मीडिया अकाउंट, पासवर्ड चोरी आणि ऑनलाइन व्यवहारातील फसवणूक याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

‘क्लिक करण्यापूर्वी विचार करा!’ असा संदेश देत अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास मोबाईल हॅक होण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले. तसेच कोणत्याही व्यक्तीस ओटीपी शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. एस. भंगाळे होते. उपमुख्याध्यापक चंद्रकांत फिरके यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसेनजित बाविसकर यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add