Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»कोरपावली येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; तिरंगा रॅलीने गावात देशभक्तीमय वातावरण

ताज्या बातम्या

कोरपावली येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; तिरंगा रॅलीने गावात देशभक्तीमय वातावरण

Editorial DeskBy Editorial DeskAugust 16, 2026Updated:August 16, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

कोरपावली : प्रतिनिधी

कोरपावली येथे डी. एच. जैन विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ‘वंदे मातरम्’च्या गजरात विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून संगीतमय तिरंगा रॅली काढली. या रॅलीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ध्वजारोहणाचा मान माजी सरपंच विलासराव अडकमोल यांना देण्यात आला. तसेच डी. एच. जैन विद्यालयातील ध्वजारोहणाचा मान चेअरमन सुधाकर प्रल्हाद नेहेते यांना देण्यात आला.

यानंतर विद्यालयात विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर संगीतमय कवायत सादर केली. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाचे संचालक, शिक्षक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सी.व्ही. नेहेते यांनी केले. चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची रूपरेषा कलाशिक्षक संतोष वानखेडे यांनी पाहिली, तर उपस्थितांचे आभार अर्चना महाजन यांनी मानले.

कार्यक्रमासाठी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी झांबरे, चेअरमन सुकलाल नेहेते, सेक्रेटरी विनायक नेहेते यांच्यासह दत्तू पाटील, मिलिंद पाटील, संजय महाजन, पोलीस पाटील सलीम तडवी, प्रगतिशील शेतकरी मुक्तार पटेल, अविनाश अडकमोल, रवींद्र तायडे, अफरोज पटेल, नवाब तडवी, जि.प. मुख्याध्यापक आरिफ तडवी, काळेसर, शहासर आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add