Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»चोपडा तालुक्यात गांजाविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; २३ वर्षीय तरुण ताब्यात

क्राईम

चोपडा तालुक्यात गांजाविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; २३ वर्षीय तरुण ताब्यात

Editorial DeskBy Editorial DeskAugust 19, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चोपडा प्रतिनिधी  | ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कारवाई करत एका २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गलगणी ते चोपडा जाणाऱ्या रस्त्यावर गलगणी शिवारातील पोलिस चौकीजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या विशेष पथकाने संशयावरून दुचाकीची तपासणी केली असता गांजा आढळून आला.

पोलिसांच्या अहवालानुसार, रिंकेंश कुमार सुरेश माधवे, रा. नांदुरा, जि. बुलढाणा, याच्या ताब्यातून हिरव्या रंगाचा गांजा तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये गांजा, बजाज पल्सर मोटारसायकल आणि मोबाईलचा समावेश आहे.

जप्त दुचाकीचा वापर गांजा वाहतुकीसाठी करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.
ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचा स्रोत, वाहतुकीचा मार्ग आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add