Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी अन् भव्य गुलाबहार; गिरीश महाजनांच्या स्वागताने जळगाव रेल्वे स्थानक दणाणले!

जळगाव

ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी अन् भव्य गुलाबहार; गिरीश महाजनांच्या स्वागताने जळगाव रेल्वे स्थानक दणाणले!

Editorial DeskBy Editorial DeskAugust 21, 2026Updated:August 21, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांचे जळगाव शहरात प्रथम आगमन झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने रेल्वे स्थानकावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

गिरीश महाजन रेल्वे स्थानकावर पोहोचताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यामुळे रेल्वे स्थानक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते गिरीश महाजन यांना भव्य गुलाबहार घालून नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी “गिरीश भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” आणि “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भाजप पश्चिम महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजप गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक ॲड. शुचिता हाडा, अरविंद देशमुख, सुरेखा तायडे, गायत्री राणे, विशाल भोळे, राजेंद्र घुगे पाटील, महानगर सचिव विशाल त्रिपाठी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागतानंतर गिरीश महाजन यांनी उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर ते जामनेरच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्या स्वागतामुळे जळगावातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add