Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पंटर पाठवला, माहिती घेतली अन् थेट छापा! अकलूदमधील कुंटणखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला

क्राईम

पंटर पाठवला, माहिती घेतली अन् थेट छापा! अकलूदमधील कुंटणखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला

Editorial DeskBy Editorial DeskAugust 21, 2026Updated:August 21, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीच्या काठावर सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांच्या नियोजनबद्ध कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालवणाऱ्या मनीषा प्रकाश झोपे (वय ४५, रा. अकलूद, ता. यावल) हिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका दुमजली घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घाई न करता संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पंटर पाठवला. माहितीची खातरजमा झाल्यानंतर उपविभागीय पोलीस कार्यालय फैजपूर, यावल पोलीस ठाणे आणि निंभोरा पोलीस ठाण्याच्या अधिकारी-अंमलदारांच्या संयुक्त पथकाने रात्री सुमारे आठ वाजता छापा टाकला.

कारवाईदरम्यान घरामध्ये अनेक खोल्या तयार करण्यात आल्याचे समोर आले. वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांची पोलिसांनी सुटका केली. यातील तीन महिला मूळच्या कलकत्ता, पश्चिम बंगाल येथील असून भुसावळ येथे स्थायिक आहेत, तर एक महिला भुसावळ येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add