Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»गुरांच्या गोठ्यात विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

क्राईम

गुरांच्या गोठ्यात विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

Editorial DeskBy Editorial DeskAugust 22, 2026Updated:August 22, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथे एका २३ वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. हॉटेल जत्राच्या मागील बाजूस असलेल्या गुरांच्या गोठ्यात हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव येथील गणेश हाजी बारेला, वय २३, हा किनगावातील हॉटेल जत्राच्या मागील बाजूस असलेल्या गुरांच्या गोठ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. त्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले.

घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी केल्यानंतर गणेश बारेला याला मयत घोषित केले.

या घटनेची माहिती यावल पोलिसांना देण्यात आल्यानंतर हाजी नानसिंग बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाने आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहेत. या घटनेमुळे आडगाव आणि किनगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add