Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»खोल विहिरीत पडून ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; अग्निशमन दलाने बाहेर काढला मृतदेह

क्राईम

खोल विहिरीत पडून ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; अग्निशमन दलाने बाहेर काढला मृतदेह

Editorial DeskBy Editorial DeskAugust 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

धरणगाव प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळे खुर्द येथे ८० फूट खोल विहिरीत पडलेल्या ५४ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वासुदेव भालेराव पाटील असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती कैलास मधुकर माळी सर यांनी अग्निशमन विभागाला दिली.

माहिती मिळताच जळगाव शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ८० फूट खोल विहिरीत वासुदेव पाटील यांचा मृतदेह असल्याचे समोर आल्यानंतर अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले.

अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन विभागाच्या पथकाने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह गावकरी, सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आला.

या घटनेमुळे पिंपळे खुर्द गावात हळहळ व्यक्त होत असून, वासुदेव पाटील यांच्या मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add