रावेर प्रतिनिधी | शहरातील शिवाजी चौक परिसरात जुन्या वादाच्या कारणातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात ५ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयेश मोतीलाल शिंदे (वय-२६, रा. छत्रपती शिवाजी चौक रावेर) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे दरम्यान 21 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जयेश हा घरी असताना संशयित आरोपी अल्पेश किशोर महाजन, मयूर गणेश महाजन, स्वप्निल अनिल महाजन, निखिल महाजन, आणि जय गणेश महाजन यांनी जय शिव त्याचे मामा यांना हातातील लोखंडी रॉडने डोक्यावर हात पायावर मारहाण करून गंभीर दुखापत केली त्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याची देखील धमकी दिली.
यासंदर्भात जयेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुखाराम काबळे हे करीत आहे.



