Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगाव एसटी आगारात कर्मचाऱ्यांचे उपोषण; विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाविरोधात नाराजी

क्राईम

जळगाव एसटी आगारात कर्मचाऱ्यांचे उपोषण; विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाविरोधात नाराजी

Editorial DeskBy Editorial DeskAugust 23, 2026Updated:August 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी के | एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव एसटी बस आगार येथे कर्मचाऱ्यांकडून उपोषण सुरू करण्यात आले आहे. कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना, महाराष्ट्रच्या जळगाव विभागाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असून, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांशी संबंधित शिस्तभंगाच्या कारवाया, आरोपपत्रे, निलंबन, सेवा प्रकरणे, पदोन्नती तसेच इतर विविध प्रश्न निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणांची चौकशी करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

काही कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवायांबाबत संघटनेने आक्षेप घेतला असून, प्रशासनाने प्रलंबित प्रकरणांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी भूमिका घेण्यात आली आहे. सेवा-संबंधित प्रश्नांचा योग्य तो निपटारा करून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कर्मचारी संघटनेने जळगाव एसटी बस आगारात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा करावी आणि मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

या उपोषणामुळे जळगाव एसटी आगारातील कर्मचारी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले असून, प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add