Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»तिघांच्या आत्महत्येने खळबळ; दोन तरुणांचा गळफास, एकाचा विहिरीत मृतदेह

क्राईम

तिघांच्या आत्महत्येने खळबळ; दोन तरुणांचा गळफास, एकाचा विहिरीत मृतदेह

Editorial DeskBy Editorial DeskAugust 31, 2026Updated:August 31, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

यावल प्रतिनिधी | यावल शहरासह तालुक्यातील वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यातील दोन तरुणांनी गळफास घेतला, तर एका व्यक्तीचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. या तिन्ही घटनांप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यावल शहरातील चोपडा रस्त्यावरील इंदिरा गांधी हायस्कूलजवळील डांगपुरा भागात शेख मुजाहिद शेख मुन्शी मोमीन (३९) यांनी गळफास घेतल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दुसऱ्या घटनेत सांगवी खुर्द येथील प्रमोद श्रावण गोसावी (४१) यांनी पायाच्या आजाराला कंटाळून गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, दहिगाव येथील नरेंद्र उर्फ ज्ञानबा यादव पाटील (३६) हे घरातून बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह सोमवारी दुपारी शेतातील विहिरीत आढळून आला.या तिन्ही घटनांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add