Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगावात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त; एफेड्रीनसह गांजा घेऊन जाणारा ५५ वर्षीय ताब्यात

क्राईम

जळगावात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त; एफेड्रीनसह गांजा घेऊन जाणारा ५५ वर्षीय ताब्यात

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 2, 2026Updated:September 2, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | शहरातील एमआयडीसी परिसरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एफेड्रीन आणि गांजाचा तब्बल ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

दरम्यान, एमआयडीसी परिसरातून एक व्यक्ती एफेड्रीन हा अमली पदार्थ घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर एलसीबी आणि एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला.
काही वेळातच नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल, वय ५५, रा. रामनगर, मेहरुण, हा दुचाकीवरून जाताना पोलिसांना दिसला.

पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. दुचाकीच्या डिक्कीत तपासणी केली असता ९ लाख ८१ हजार ५०० रुपये किमतीची १ किलो ९६३ ग्रॅम एफेड्रीन पावडर, तसेच १ लाख ५ हजार ७०० रुपये किमतीचा २ किलो ११४ ग्रॅम गांजा आढळून आला.

यासोबतच ३० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add