जळगाव प्रतिनिधी | विचार वारसा फाउंडेशनच्या वतीने आगामी गणेशोत्सव २०२६ साठी नव्या अधिकृत कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सर्वसंमतीने कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यंदाच्या गणेशोत्सवाची धुरा अध्यक्षपदी आशिष भरतसिंग राजपूत यांच्याकडे सोपविण्यात आली असून गौरव डिगबर डांगे यांची उपाध्यक्षपदी, तर संकेत संजय म्हसकर यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आकाश तोमर यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
करण गरुड, कैलास पाटील आणि राकेश मराठे यांची सहकार्याध्यक्षपदी निवड झाली. चेतन राजपूत कोषाध्यक्ष, तर ऋषिकेश राजपूत आणि योगेश धनगर सहकोषाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. यासोबतच सल्लागार, संघटक, माध्यम व प्रसिद्धी विभाग तसेच कार्यकारिणी सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली.
गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बैठकीच्या शेवटी संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.



