Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मद्यपी मुलाचा कुटुंबीयांकडून गळा आवळून खून; आई-वडील आणि भावाला अटक

क्राईम

मद्यपी मुलाचा कुटुंबीयांकडून गळा आवळून खून; आई-वडील आणि भावाला अटक

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 5, 2026Updated:September 5, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगावात दारूच्या व्यसनाला कंटाळलेल्या कुटुंबीयांनी २६ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राधेश्याम हरचंद राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मृताच्या आई-वडिलांसह भावाला अटक केली आहे.

पोलिस तपासानुसार, राधेश्याम हा मद्याच्या आहारी गेला होता. दारू पिऊन तो कुटुंबीयांना सतत शिवीगाळ तसेच मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. या त्रासाला कंटाळून कुटुंबीयांनी त्याचा खून केल्याचा आरोप आहे.

तपासात धक्कादायक बाब समोर आली. भाऊ सचिन याने राधेश्यामचे दोन्ही हात पकडले, आई मीराबाई राठोड त्याच्या पायांवर बसली, तर वडिलांनी दोरीच्या साहाय्याने त्याचा गळा आवळल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेनंतर कुटुंबीयांनी आत्महत्येचा बनाव केल्याचेही समोर आले. मात्र वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांच्या तपासातून हा प्रकार आत्महत्या नसून खून असल्याचे उघड झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add