Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»धक्कादायक : केवळ आठशे रुपयांसाठी मामे भावाचा खून: संशयिताला अटक

क्राईम

धक्कादायक : केवळ आठशे रुपयांसाठी मामे भावाचा खून: संशयिताला अटक

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 22, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

भडगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील भडगाव परिसरात अवघ्या ८०० रुपयांच्या वादातून आत्याच्या मुलाने मामे भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मा जुगा पवार असे मृताचे नाव असून, जुगा कांतिलाल पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत आरोपीने मृताच्या तोंडातील दात दगडाने तोडून ते बॅगेत ठेवल्याची माहिती समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मा पवार आणि जुगा पवार हे दोघेही गावोगावी फिरून बनावट रुद्राक्ष विकण्याचे काम करत होते. घटनेच्या दिवशी धर्मा पवार याने रुद्राक्ष विकून सुमारे ८०० रुपये मिळवले होते. त्यानंतर दोघेही सायंकाळच्या सुमारास स्टेशनजवळ दारू पिण्यासाठी बसले. याचवेळी पैशांच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने धर्मा पवार याच्यावर दगडाने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या मारहाणीत धर्मा पवार याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

दरम्यान, शेताजवळ कुत्रे भुंकत असल्याचा आवाज पोलिसांच्या लक्षात आला. त्या दिशेने शोध घेतला असता आरोपी जुगा पवार हा दारूच्या नशेत शेतात बसलेला आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या बॅगेची तपासणी केली असता मृताचे दात आढळून आल्याची माहिती आहे. त्याच बॅगेत खाण्यासाठी ठेवलेली दोन जिवंत कबुतरे देखील आढळून आल्याचे सांगण्यात आले.

या धक्कादायक प्रकारामुळे भडगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, खुनामागील नेमका घटनाक्रम आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add