Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»खडसेंच्या निवासस्थानी ड्रोन रेकीचा आरोप; सखोल चौकशीची राष्ट्रवादीकडून मागणी

क्राईम

खडसेंच्या निवासस्थानी ड्रोन रेकीचा आरोप; सखोल चौकशीची राष्ट्रवादीकडून मागणी

Editorial DeskBy Editorial DeskOctober 5, 2026Updated:October 5, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी ड्रोनच्या माध्यमातून रेकी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खडसे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. मात्र, तक्रार करूनही अद्याप या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याप्रकरणी निवेदन साद केले. ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या कथित रेकीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

खडसेंच्या निवासस्थानी ड्रोन नेमका कोणी उडवला, त्यामागील उद्देश काय होता आणि या घटनेशी संबंधित व्यक्ती कोण आहे, याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतरही कारवाई प्रलंबित असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

या प्रकरणातील संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी करावी आणि दोष आढळल्यास संबंधितावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add