Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»फत्तेपूर पोलिसांची धडक कारवाई! प्रतिबंधित गुटखा अन् तंबाखू जप्त; तरुणाला अटक

क्राईम

फत्तेपूर पोलिसांची धडक कारवाई! प्रतिबंधित गुटखा अन् तंबाखू जप्त; तरुणाला अटक

Editorial DeskBy Editorial DeskOctober 23, 2026Updated:October 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. फत्तेपूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत सुमारे १ लाख ६ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजता फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत फत्तेपूर ते कसबावाडी रस्त्यावर एका इसमाकडून प्रतिबंधित विमल पानमसाला व व्ही-१ सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.

या कारवाईत प्रसाद दामू वाणी (वय २१, रा. चिंचोलीपिंप्री, ता. जामनेर, जि. जळगाव) याच्याकडून प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि (एमएच-१९-ईवाय-१३५७) क्रमांकाची इलेक्ट्रिक स्कूटर असा एकूण १ लाख ६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी किशोर हिंमतरााव बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून २३ ऑक्टोबर रोजी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलिसांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add