Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»दुष्काळात पशुधनासाठी चारा व्यवस्थापनावर भर द्या! सीईओ करिष्मा नायर यांचे आवाहन

जळगाव

दुष्काळात पशुधनासाठी चारा व्यवस्थापनावर भर द्या! सीईओ करिष्मा नायर यांचे आवाहन

Editorial DeskBy Editorial DeskOctober 24, 2026Updated:October 24, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संवर्धन करण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांनी चारा व्यवस्थापनाचे शास्त्रीय तंत्र अवलंबावे. उपलब्ध पीक अवशेषांचा योग्य वापर करून पशुधनासाठी पुरेसा आणि सकस चारा उपलब्ध करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी केले.

जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील पशु चिकित्सालयात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियानांतर्गत’ आयोजित कार्यक्रमात त्या पशुपालक, दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत होत्या. यावेळी दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची उपलब्धता, चारा उत्पादन आणि पशुखाद्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पीक अवशेषांपासून सकस चारा निर्मिती

कार्यक्रमात निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याच्या विविध पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. युरिया-मोलॅसिस प्रक्रियेद्वारे कुटाराची गुणवत्ता वाढविणे, हिरवा मका आणि नेपियर गवतापासून मुरघास तयार करणे, तसेच कमी खर्चात अझोला उत्पादन आणि जलसंवर्धित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलद हिरवा चारा तयार करण्याबाबत माहिती देण्यात आली.

सोयाबीन, हरभरा, गहू यांसारख्या पिकांचे अवशेष जाळून टाकण्याऐवजी त्यावर योग्य प्रक्रिया करून पशुखाद्य म्हणून वापर करावा. यामुळे चाऱ्याची उपलब्धता वाढण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक लाभही मिळू शकतो, असे नायर यांनी स्पष्ट केले.

रब्बी हंगामात चारा बियाण्यांचे १०० टक्के अनुदानावर वाटप

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी रब्बी हंगामात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ज्वारी, बाजरी आणि मका या चारा पिकांच्या बियाण्यांचे १०० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेऊन चारा उत्पादन वाढवावे आणि आगामी टंचाईचे नियोजन आतापासूनच करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या अभियानाला पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १५० पशुपालकांनी चारा बियाण्यांच्या मागणीसाठी गुगल फॉर्म भरून दिले.

यावेळी डॉ. अनिल शिंदे, डॉ. आर. एस. जाधव, डॉ. विकास इंगळे, डॉ. राधिका इंगळे, डॉ. निलेश बारी, डॉ. योगेश पाटील, डॉ. हेमंत कुमावत यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने पशुपालक उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add