Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»भीषण अपघात : कानळदा रोडवर वाहन पलटी; सत्संगासाठी जाणारे १९ जण गंभीर जखमी

क्राईम

भीषण अपघात : कानळदा रोडवर वाहन पलटी; सत्संगासाठी जाणारे १९ जण गंभीर जखमी

Editorial DeskBy Editorial DeskOctober 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | मध्य प्रदेशात आयोजित सत्संग कार्यक्रमासाठी जात असताना ४०७ मालवाहू वाहनाचा मागील चाकाचा एक्सल तुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील कानळदा रोडवर घडली. बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

एक्सल तुटल्याने वाहन दोन वेळा पलटी झाले. या दुर्घटनेत १९ जण गंभीर जखमी झाले असून, सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वराड सिम, कुऱ्हा, मोंढाळा, खंडाळा, सिंधी आणि मांडवा या परिसरातील आदिवासी बांधव मध्य प्रदेशात आयोजित सत्संग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. यासाठी त्यांनी ४०७ मालवाहू वाहनातून प्रवास सुरू केला होता. हे वाहन ममुराबाद रोडमार्गे चोपडा आणि तेथून मध्य प्रदेशाच्या दिशेने जात होते.

दरम्यान, कानळदा रोडवरील बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराच्या पुढे जात असताना अचानक वाहनाच्या मागील चाकाचा एक्सल तुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन दोन वेळा पलटी झाले. या अपघातामुळे वाहनातील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. वाहनात सुमारे २० ते २५ जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

*जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल*

अपघाताची माहिती मिळताच जखमींना मदत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकांसह खासगी वाहनांच्या मदतीने जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघातातील जखमींमध्ये लहान मुलांसह महिला आणि पुरुषांचाही समावेश आहे.

*लहान मुलांसह १९ जण जखमी*

या अपघातात कमल बारेला (वय २५), सुरेश देवसिंग बारेला (४०), रवींद्र सिताराम मोरे (१२), प्रवीण सिताराम मोरे (११), सईती मगन मोरे (७), नवलसिंग सिताराम मोरे (२५), रूपाली सावरिया बारेला (१८), रमेश धनसिंग बारेला (२८), राजाराम बारेला (४०), रितेश खुलसिंग बारेला (२३), पवन धासीलाल बारेला (८), विजय रेमला बारेला (२२), अर्जुन राजाराम बारेला (१८), सावरिया हिम्मत बारेला (३८), गांजीलाल बारेला (३०), सचिन बन्सीलाल बारेला (१५), बन्सीलाल चिनूसिंग बारेला (५५), सुनील दरबार बारेला (१५) आणि अजय गुडिया बारेला (१५) हे १९ जण जखमी झाले आहेत.

सत्संगासाठी निघालेल्या आदिवासी बांधवांच्या प्रवासादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाहनाचा एक्सल तुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, अपघाताची नेमकी कारणे आणि पुढील तपशील संबंधित यंत्रणांच्या तपासानंतर स्पष्ट होतील. या संदर्भात अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add