Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»बायपासवरील क्रेन कोसळून चालकाचा मृत्यू प्रकरणी ठेकेदारासह दुसऱ्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल

क्राईम

बायपासवरील क्रेन कोसळून चालकाचा मृत्यू प्रकरणी ठेकेदारासह दुसऱ्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल

Editorial DeskBy Editorial DeskOctober 26, 2026Updated:October 26, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव (प्रतिनिधी) | जळगाव बायपासवरील रेल्वे पुलाच्या कामादरम्यान क्रेनसह खाली कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदार हरिओम लक्ष्मीनारायण ओझा (रा. इंदूर, मध्यप्रदेश) आणि दुसरा क्रेन ऑपरेटर बन्समनी जानकीप्रसाद प्रजापती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुकर धनराज पाटील (४३, रा. खपाट, ता. धरणगाव) असे मृत चालकाचे नाव आहे. २३ ऑक्टोबर रोजी रेल्वे पुलाच्या सिमेंट काँक्रीटचे जॉइंट स्लॅब काढण्याचे काम सुरू होते. यावेळी मधुकर पाटील हे क्रेनच्या साहाय्याने स्लॅब वर उचलून धरत होते. पुलाच्या दुसऱ्या बाजूला बन्समनी प्रजापती हा दुसऱ्या क्रेनच्या मदतीने स्लॅबला खालून आधार देत होता.

मात्र, प्रजापती याने खालचा आधार काढून घेतल्याने मधुकर पाटील यांच्या क्रेनची रोप वायर तुटली. त्यामुळे क्रेनसह पाटील पुलावरून खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

या कामादरम्यान ठेकेदाराने मधुकर पाटील यांना सुरक्षेची आवश्यक साधने दिली नव्हती. तसेच पुलाखाली सुरक्षा जाळी न लावताच काम सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मृताचे चुलत भाऊ दीपक वामन पाटील (५०, रा. खपाट, ता. धरणगाव) यांनी पाळधी पोलीस औट पोस्ट येथे फिर्याद दिली. त्यानुसार ठेकेदार हरिओम ओझा आणि क्रेन ऑपरेटर बन्समनी जानकीप्रसाद प्रजापती या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add