Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»अडावद पोलिसांची मोठी कामगिरी! तीन महिन्यांत २० बेपत्ता व्यक्तींचा शोध

क्राईम

अडावद पोलिसांची मोठी कामगिरी! तीन महिन्यांत २० बेपत्ता व्यक्तींचा शोध

Editorial DeskBy Editorial DeskOctober 26, 2026Updated:October 26, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चोपडा प्रतिनिधी | अडावद पोलिसांनी अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता व अपहृत मुली, महिला आणि पुरुषांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. कसून तपास, गोपनीय माहिती आणि आधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी ही कामगिरी केली.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास केला.

बेपत्ता व्यक्ती तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो कायद्यांतर्गत दाखल अपहरणाच्या गुन्ह्यांतील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथके तयार केली होती. घटनास्थळांची पाहणी, साक्षीदारांची चौकशी, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) चे विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत अल्पवयीन मुली, महिला आणि पुरुषांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या कामगिरीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

प्रशांत कंडारे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, जितेंद्र सोनवणे, सुनील तायडे तसेच जयदीप राजपूत, विनोद धनगर, संजय धनगर, शेषराव तोरे, किरण शिरसाठ, अन्वर तडवी, भूषण चव्हाण आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या मराठे यांनी सहभाग घेतला.

हरवलेले आप्त सुखरूप परत मिळाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले असून, अडावद पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add