Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»लोणी बुद्रुकमध्ये घरफोडी; एक लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास!

क्राईम

लोणी बुद्रुकमध्ये घरफोडी; एक लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास!

Editorial DeskBy Editorial DeskOctober 27, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पारोळा प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे एक लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला असून, या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी बुद्रुक येथील फिर्यादी यांच्या राहत्या घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारला. यामध्ये ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच १२ भार वजनाचे चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरी झालेल्या ऐवजाची एकूण अंदाजित किंमत एक लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

२५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजल्यापासून ते २६ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेचार वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटाचे कुलूप तोडले आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला.

घरातील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add