Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»जळगाव मनपा महापौर उपमहापौर पदासाठी भाजप सेनेने घेतले अर्ज !

राजकारण

जळगाव मनपा महापौर उपमहापौर पदासाठी भाजप सेनेने घेतले अर्ज !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 1, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

दोन्ही पक्षांकडून नावांची घोषणा नाही ; जळगावकरांची उत्सुकता शिगेला !

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर कोण होणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असून भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांनी अद्यापही आपली पत्ते उघड न केल्याने सस्पेन्स कायम आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी भाजपकडून प्रत्येकी सहा असे एकूण १२ अर्ज तर शिवसेनेकडून महापौरपदासाठी दोन आणि उपमहापौरपदासाठी दोन असे चार अर्ज घेण्यात आले.मात्र येत्या २ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उप महापौर पदासाठी कुणाची नावे समोर येतात याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता प्राप्त करून यश प्राप्त केले आहे. भाजपने ४६ जागांवर, शिवसेना (शिंदे गट) ने २२ जागांवर विजय मिळविला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि एका अपक्ष उमेदवारास प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. त्यामुळे महायुतीचे एकूण संख्याबळ ७० वर पोहोचले असून, महापौरपद भाजपकडे आणि उपमहापौरपद शिवसेनेकडे जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज घेण्यात आले नव्हते. मात्र अंतिम दिवशी शुक्रवार दि. ३० रोजी भाजपचे शहर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, गटनेते प्रकाश बालाणी, उपगटनेते नितीन बरडे तसेच प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील हे दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास महापालिकेत दाखल झाले. यावेळी नगर सचिव सतीश शुक्ला यांच्याकडून प्रकाश बालाणी यांनी महापौरपदासाठी चार अर्ज, नितीन बरडे यांनी उपमहापौरपदासाठी चार अर्ज, तर प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी महापौरपदासाठी दोन अर्ज घेतले. याशिवाय डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी उपमहापौरपदासाठीही दोन अर्ज घेतल्याने भाजपकडून एकूण १२ अर्ज घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) कडून चौथ्यांदा निवडून आलेले नगरसेवक मनोज सुरेश चौधरी हे दुपारी साडेबाराच्या सुमारास महापालिकेत दाखल झाले. त्यांनी महापौर पदासाठी दोन तर उपमहापौर पदासाठी दोन अर्ज घेतले.आता दि. २ फेब्रुवारी रोजी कोण उमेदवारी अर्ज दाखल करतो आणि कोणाच्या नावावर महापौर व उपमहापौरपदाची माल गळ्यात पडते याकडे संपूर्ण शहरासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add