Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडें यांच्या संदर्भात आज एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली

ताज्या बातम्या

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडें यांच्या संदर्भात आज एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 3, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड ; संभाजीनगरहून उड्डाणापूर्वीच धोका टळला

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी । भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडें यांच्या संदर्भात आज एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून उड्डाण घेण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्याने संभाव्य धोका टळला आहे. सुदैवाने हा बिघाड टेकऑफपूर्वीच पायलटच्या लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडे लातूर दौऱ्यावर जाणार होत्या. मात्र उड्डाणापूर्वी हेलिकॉप्टरची तपासणी करत असताना पायलटला तांत्रिक बिघाड आढळून आला. सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले आणि पंकजा मुंडेंनी आपला नियोजित प्रवास तसेच सभांच्या वेळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने लातूर दौरा काही काळासाठी रखडला असून आता दुसऱ्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पंकजा मुंडे लातूर येथील प्रचार सभांना उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या संपूर्ण दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

दरम्यान, काल पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित होत्या. वाळूज परिसरात झालेल्या प्रचार सभेत त्यांनी आपल्या भाषणात “जिल्हा परिषदेच्या प्रचारादरम्यान मी हेलिकॉप्टरने फिरते, म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते,” असे भावनिक वक्तव्य केले होते. अवघ्या एका दिवसानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आल्याने या वक्तव्याचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

राज्यात नुकताच झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघातानंतर हवाई प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमधील बिघाडाची घटना घडल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. हवाई प्रवासादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add