Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगाव शहरात संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी सोहळा

जळगाव

जळगाव शहरात संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी सोहळा

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 5, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे दर्शन या निमित्ताने घडले.

जळगाव प्रतिनिधी । संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्था, मेहरून यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७४० व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जळगाव शहरात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे दर्शन या निमित्ताने घडले.

पालखी सोहळ्याची सुरुवात मेहरून येथील साईबाबा मंदिरातून करण्यात आली. प्रारंभी श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे तसेच पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीगीतांच्या निनादात पालखी मिरवणूक मार्गस्थ झाली. मेहरून परिसरातील विविध भागांतून, विश्वकर्मा नगर आणि रामेश्वर कॉलनी मार्गे ही पालखी गणपती मंदिर येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर भाविकांनी पुष्पवृष्टी करत पालखीचे स्वागत केले. गणपती मंदिरात पालखीची सांगता करण्यात आली असून माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते पालखी पूजन उत्साहात पार पडले.

या पुण्यतिथी महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे समाजातील गुणवंत युवतीचा गौरव. पंतप्रधान एनसीसी सायकल रॅलीमध्ये सहभागी होत पुणे ते नवी दिल्ली हे तब्बल १६८० किलोमीटरचे अंतर अवघ्या २१ दिवसांत यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सायकलवीर भाग्यश्री दुसाने हिचा सोनार समाजातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून तिच्या जिद्द, चिकाटी आणि राष्ट्रप्रेमाचे कौतुक करण्यात आले. तिचे हे यश समाजातील तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

या सोहळ्यासाठी मेहरून व परिसरातील सोनार समाजातील महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. संत नरहरी महाराज यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक सलोखा, संस्कार आणि एकतेचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add