Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला

ताज्या बातम्या

महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 9, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जुगार अड्ड्यावर छापा! १३ जणांवर गुन्हा दाखल; ७,११० रुपये जप्त

चाळीसगाव – ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने शिंदी गावातील बाजार पट्टीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून १३ जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत एकूण ७ हजार ११० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत शिंदी गावातील बाजार पट्टीजवळील मोकळ्या जागेत काही इसम पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार पंचनामा करून शासकीय वाहनाने पोलीस पथकाने छापा टाकला.छाप्यात रामेश्वर रामदास राठोड (३०), संदिप शिवनाथ दौड (वय ४४), हेमंत आण्णासाहेब राऊत (५२), गोरख मुरलीधर दौड (४२), बाळू शिवराम नेवरे (५०), शेख सेरिफ शेख बनीर (७०), मनोहर जगन्नाथ फाटे (४६), गजेंद्र वाल्मीक राठोड (३५), श्रावण महादू ठाकरे (४१), कैलास रामभाऊ गरुड (६०), रणजीत चांगदेव पवार (४८) सर्व रा. शिंदी ता. चाळीसगाव, तसेच रमेश लक्ष्मण राठोड (३३) रा. शिंदी तांडा व अनिल मगन राठोड (३५) रा. राजदेहरे, ता. चाळीसगाव अशा १३ जणांना ताब्यात घेण्यात आले.

पंचासमक्ष अंगझडती घेतली असता संबंधितांकडून वेगवेगळ्या प्रमाणात रोख रक्कम व ५२ पत्त्यांचे दोन कॅट जुगाराचे साहित्य मिळून आले. एकूण ७,११० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणी महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अक्रम मुबारक बेग करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add