Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटन बळकटीच्या दृष्टीने सातत्याने महत्त्वपूर्ण निर्णय

राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटन बळकटीच्या दृष्टीने सातत्याने महत्त्वपूर्ण निर्णय

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 9, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे

जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटन बळकटीच्या दृष्टीने सातत्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेत असून, त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या कार्याला नवी दिशा देणारी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने कल्पिता पाटील यांची जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र जारी करण्यात आले असून, दि.५ फेब्रुवारी रोजी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. कल्पिता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनिष्ठ, सक्रिय आणि अभ्यासू कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवती काँग्रेसच्या माध्यमातून केली असून, विविध पदांवर जबाबदारीने काम करत पक्षसंघटनेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

विशेष म्हणजे, कल्पिता पाटील या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या सरपंच ठरल्या होत्या. २०१३ मध्ये कल्याणेहोळ गावच्या सरपंचपदाची धुरा त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळत गावविकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावी काम केले. त्यांच्या कार्यकाळात गावाच्या विकासाला गती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. २०१६ मध्ये दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या परिषदेत भारतातील ५ व्यक्तींची निवड झाली होती त्यात कल्पिता पाटील यांचा सहभाग होता.

पक्षवाढीसाठी त्यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक काम केले असून, विविध आंदोलने, निदर्शने आणि लोकशाही मार्गाने करण्यात आलेल्या संघर्षांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची त्यांची भूमिका नेहमीच लक्षवेधी राहिली आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला होता.

नियुक्तीपत्रात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जळगाव ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कल्पिता पाटील यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत व अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add